जळगाव महापालिका निवडणूक : दिवसभरात शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध


Jalgaon Municipal Corporation Election : Two Shiv Sena candidates elected unopposed during the day जळगाव (1 जानेवारी 2026) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने विजयी घौडदौड कायम ठेवली असून सुरूवातीला उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नववर्षाच्या सुरूवातीला गुरुवार, 1 रोजी दिवसभरात दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने प्रभाग 9 अ मधील मनोज सुरेश चौधरी बिनविरोध झाले तर प्रभाग क्रमांक 9 ब मधून प्रतिभा गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अपक्ष उमेदवाराची माघार
बुधवारी संध्याकाळी 12 ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध झाल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे 18 अ मध्ये डॉ.गौरव चंद्रकांत सोनवणे हे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर सोनवणे यांच्या माघारीमुळे बिनविरोध निश्चित झाले तर दुपारी दोन वाजता 9 अ मध्ये अपक्ष उमेदवार राहुल अशोक लोखंडे यांनी माघार घेतल्याने मनोज सुरेश चौधरी बिनविरोध ठरले. निवडणूक निकालानंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.



प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार प्रतिभा सुधीर पाटील यांनी माघारीच्या पहिल्याच दिवशी माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख बिनविरोध झाल्या आहेत.विजयानंतर उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !