नांदेड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; अशोक चव्हाणांनी उमेदवारीसाठी 50 लाख घेतल्याचा आरोप


Internal conflicts within the Nanded BJP come to the fore; allegations surface that Ashok Chavan took 50 lakhs for a party ticket नांदेड (1 जानेवारी 2026) : नांदेड भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून माजी नगरसेवकाने थेट भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. हा आरोप चव्हाण यांचे जुने सहकारी व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवकाच्या आरोपाने खळबळ
नांदेड महापालिकेची निवडणूक ही प्रथमच अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना अनेक इच्छुकांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा देखील समावेश आहे. मुलाचे तिकीट कापल्याने भानुसिंह रावत यांनी नाराजी व्यक्त करत अशोक चव्हाण यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकाकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला तसेच प्रभाग क्रमांक 16 मधून आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती परंतु, कुठलेही ठोस कारण न देता ऐनवेळी उमेदवारी नाकारात आमच्यावर अन्याय केल्याचाही आरोप रावत यांनी केला आहे.


अनेकांची उमेदवारी कापली
भानुसिंह रावत हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकीय प्रवासात सक्रिय आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा रावत यांच्यासह 35-40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गाडीपुरा प्रभागातून ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, सर्वांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले असताना ऐनवेळी अनेकांची उमेदवारी कापल्याने रावत यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एकाच घरातील पती, पत्नी आणि पिता-पुत्राला उमेदवारी दिल्यावरून देखील रावत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !