भाविकांना दिलासा ; प्रयागराज रामबाग व झूसी स्थानकांवर रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा

अप-डाऊन दिशेतील निवडक रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन मिनिटांचा अतिरिक्त थांबा ; विविध तारखांना निर्णय लागू


Relief for devotees ; trains to have temporary stops at Prayagraj Rambagh and Jhusi stations भुसावळ (2 डिसेंबर 2026) : माघ मेळा-2026 च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अप (यूपी) व डाऊन (डीएन) दिशेने धावणार्‍या काही निवडक रेल्वेगाड्यांना प्रयागराज रामबाग व झूसी या स्थानकांवर प्रत्येकी दोन मिनिटांचा तात्पुरता अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे माघ मेळ्यासाठी प्रवास करणार्‍या भाविकांचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

या गाड्यांना मिळाला तात्पुरता थांबा
रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर, दानापूर-उधना, दरभंगा-पुणे, रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे-गोरखपूर आदी महत्त्वाच्या मार्गांवरील गाड्यांना ठराविक कालावधीत हा अतिरिक्त थांबा दिला जाणार आहे. माघ मेळ्याच्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांना प्रयागराज परिसरात उतरणे व चढणे अधिक सोयीचे ठरणार आहे.






यामध्ये गाडी क्रमांक 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस व 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस या गाड्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील विविध तारखांना थांबा देण्यात येणार आहे. तसेच 20934 दानापूर-उधना व 20933 उधना-दानापूर, 11034 दरभंगा-पुणे व 11033 पुणे-दरभंगा, 15267 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस अंत्योदय व 15268 लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल अंत्योदय, तसेच 11037 पुणे-गोरखपूर व 11038 गोरखपूर-पुणे एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना या तात्पुरत्या थांब्यांची नोंद घ्यावी. तसेच गाड्यांच्या अचूक तारखा, वेळापत्रक व इतर माहितीसाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा नजीकच्या रेल्वे चौकशी केंद्राशी संपर्क साधावा. माघ मेळा-2026 दरम्यान भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !