सुरक्षित प्रवास हीच एसटीची विश्वासार्हता : यावलला पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे

यावल एसटी आगारात रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन


Safe travel is the hallmark of ST’s reliability : Police Inspector Ranganath Dharbale at Yawal यावल (3 जानेवारी 2026) : सुरक्षित प्रवास हीच एसटीची विश्वासाहर्ता आहे. सर्वसामान्य प्रवाशांना राज्य परिवहन मंडळाच्या चालकावर विश्वास आहे. आगारातील चालक आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडताना प्रवाशांना सुरक्षित रित्या पोहोचवण्याची खात्री देतात. अपघाताची विविध कारणे असतात मात्र या सर्वांवर मात करीत परिवहन मंडळाने आजवर उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत समाजात आपली विश्वासहर्ता निर्माण केली आहे. तेव्हा हीच विश्वासार्हता पुढे कायम टिकली पाहिजे, असे प्रतिपादन यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले. ते यावल एसटी आघात सुरक्षितता अभियान सडक सुरक्षा जीवन रक्षा या अभियानाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन
यावल एस.टी. आगारामध्ये सोमवारी रस्ता सुरक्षितता, सडक सुरक्षितता जीवनरक्षा अभियानाचे उद्घाटन यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन उपस्थित होते.



एस.टी.ने विश्वासार्हता कमावली
याप्रसंगी पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात सुरक्षित प्रवासा संदर्भात परिवहन मंडळाच्या एसटीने एक विश्वासार्हता कमावली आहे व यासाठी एस.टी. आगारातील चालक हे प्रामुख्याने जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे ही विश्वासार्हता टिकली आहे. यापुढेदेखील ती टिकली पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. अपघाताची विविध कारणे असतात, या सर्वांवर मात करीत एस.टी.ने आजवरची तिची वाटचाल ही चांगल्या दिशेने सुरू ठेवली आहे. चालकांनीदेखील यापुढे आपले कर्तव्य पार पाडत असताना हीच विश्वासहर्ता कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यांनी घेतले परिश्रम
अभियान हे संपूर्ण महिनाभर चालणार असून यात उत्कृष्ट कार्य बजावणार्‍या चालक, वाहक आदींना सन्मानित देखील केले जाणार आहे. सूत्रसंचालन अतुल यादव यांनी तर आभार आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी आगार लेखाकार जतीन बारसे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, निलेश महाजन, वाहतूक नियंत्रक विकास करांडे, लिपिक अतुल चौधरी, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

नियमित आरोग्य तपासणी करावी
परिवहन मंडळात कर्तव्य बजावणार्‍या सर्व चालकांनी नियमित आपली आरोग्य तपासणी ही केली पाहिजे. आपण वाहन चालवताना आपल्यावर असंख्य प्रवाशांची जबाबदारी असते. अशात आपण देखील आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. अनेक घटनांमध्ये काही चालकांना वाहन चालवताना अस्वस्थतेच्या कारणामुळे अपघात घडल्याचे देखील आपण पाहिलेले आहेत. यासाठी प्रत्येकाने आपली आरोग्याची नियमित तपासणी करावी, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी सांगितले.

प्रवाशांचे हित जोपासण्याचे कार्य
राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी.बस सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचे हित जोपासण्याचे कार्य आजपर्यंत झालेले आहे. अनेकवेळा प्रवासी आपल्या चीज वस्तू विसरतात त्या प्रामाणिकपणे परिवहन मंडळाकडून परत देखील दिल्या जातात व एसटीची सुरक्षित प्रवासासह प्रवाशांची हित जोपासणारी लाल परी म्हणून देखील ओळख आहे, असे प्रतिपादन निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले.

टीम वर्कचे यश
राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी.ची समाजातील विश्वासहर्ता ही टीमवर्कमुळे शक्य आहे. आहे त्या कर्मचार्‍यात व्यवस्थित नियोजन आखणे आहे. त्यात एस.टी. बसेसच्या माध्यमातून सेवा पुरवणे. यात कार्यालयीन कर्मचारीसह यांत्रिकीकरण विभाग यांचीदेखील मोठी मेहनत यामागे आहे. व या सर्वांच्या माध्यमातून एक टीम वर्कद्वारे आज एसटीची ही घोडदौड यशस्वीरित्या सुरू आहे, असे प्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !