विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणाला सुरूवात : अपघाताच्या कारणांचा लवकरच होणार उलगडा
Analysis of the black box begins after the plane crash : The causes of the accident will be revealed soon मुंबई (5 फेब्रुवारी 2026) : स्व.अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपासातील दुवा ठरणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांकडून अत्यंत दक्षतेने आणि प्रोटोकॉलनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे.
अपघाताचे मूळ कारण येणार समोर
विमान अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत सापडल्याने तपासाला मोठी दिशा मिळाली होती मात्र त्यातील डेटा उघडणे ही अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक प्रक्रिया असल्याने ती विशेष तज्ञांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची सर्व तांत्रिक माहिती, इंजिनाची स्थिती, पायलट आणि कंट्रोल रूममधील संवाद, तसेच शेवटच्या क्षणांतील नोंदी साठवलेल्या असतात त्यामुळे या डेटाचे विश्लेषण अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

विमान कंपनी मालकांवर होणार कारवाई
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. केंद्राच्या आय.बी. विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला असून या माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
तज्ज्ञांकडून खबरदारी
तपास अधिकार्यांच्या मते, ब्लॅक बॉक्समधील माहिती व्यवस्थितरीत्या मिळवण्यासाठी विशेष प्रयोगशाळेत उच्च तांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे. डेटा खराब झालेला नसल्याची प्राथमिक खात्री मिळाल्यानंतरच रिकव्हरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली जात असून, कोणतीही माहिती नष्ट होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे. संबंधित तज्ञांची टीम या कामात गुंतलेली आहे.







