भुसावळ पालिकेचे अभियंता वैभव पवार यांचा अपघाती मृत्यू : रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन लावणार्या चालकाविरोधात गुन्हा
भुसावळ (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : सार्वजनिक रस्त्यावर वाहन बेपर्वाईने वाहन उभे केल्यामुळे अपघात होवून भुसावळातील पालिकेचे अभियंता वैभव पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गत महिन्यात दिवाळीच्या काळात शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. या अपघातात पवार यांच्या भगिनीदेखील गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीच्या शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
असा घडला अपघात
भुसावळ पालिकेच्या संकीर्ण विभागातील कार्यालय अधीक्षक वैभव प्रकाश पवार (35) हे शनिवार, 31 रोजी हे भगिनी रोशनी सुरेश पवार (30) सोबत आपल्या पांढर्या रंगाच्या कारने (एम.एच.19 ई.पी. 3222) ने प्रवास करीत असताना कुकरेजा शॉपजवळ बेपर्वाईने लावलेल्या वाहन पांढर्या रंगाच्या वाहनामुळे अपघात घडला. भरधाव वेगातील वाहन दुसर्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात थेट झाडावर धडकल्याने या अपघातात कार चालवत असलेल्या वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने तातडीने मदतीसाठी कोणीही धावून आले नाही तर अपघातात रोशनी पवार हे या जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले होते.
संशयीत वाहन डीजेचे ?
अपघात प्रकरणी सुरूवातीला भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर आता अपघाताला कारणीभूत असलेल्या पांढर्या रंगाच्या वाहनावरील चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात रोशनी सुरेश पवार (30, व्ही.आय.पी.कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहम्मद अली सत्तार सैय्यद करीत आहेत.
