भारतावरील अमेरिकेचे अतिरिक्त शुल्क आजपासून रद्द

व्यापार कराराची चौकट जाही : 30 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ खुली ; भारत 500 अब्ज डॉलरचा माल खरेदी करेल


The additional US tariffs on India have been lifted from today नवी दिल्ली/वॉशिंग्टन डीसी (7 फेब्रुवारी 2026) : भारत आणि अमेरिकेने शुक्रवारी अंतरिम व्यापार कराराची एक रूपरेषा जारी केली असून या अंतर्गत भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा कर 50 टक्के ने कमी करून 18 टक्के करण्यात आला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लावलेला 25 टक्के अतिरिक्त करदेखील काढून टाकण्यात आला आहे.

दोन्ही देशांनी सांगितले की, ही रूपरेषा लवकरच लागू केली जाईल आणि व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराच्या (बीटी) दिशेने चर्चा पुढे जाईल. भारत-अमेरिकाच्या संयुक्त निवेदनानुसार, ही रूपरेषा 13 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झालेल्या भारत-अमेरिका इढ- वाटाघाटींना पुढे नेईल.

या करारामध्ये पुढे बाजारपेठेत प्रवेश, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि व्यापार अडथळे कमी करणे यासारख्या तरतुदींचा समावेश असेल. या अंतर्गत, भारत अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करेल किंवा कमी करेल. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, हा करार भारतीय निर्यातदारांसाठी 30 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ खुली करेल.

शेतकरी आणि मच्छीमार सर्वात मोठे लाभार्थी असतील आणि यामुळे महिला व तरुणांसाठी लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !