भुसावळात कर्करोग तपासणी शिबिराला प्रतिसाद


Cancer screening camp in Bhusawal receives good response भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळातर्फे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून मंगळवार, 4 रोजी तेरापंथ महिला मंडळाच्या माध्यमातून डॉ.दीपा रत्नानी यांच्या दवाखान्यात ‘आरोग्यम पॅप स्मीअर कर्करोग चाचणी’ शिबिर घेण्यात आले. यावेळी मंडळाच्या 11 महिलांनी तपासणी करून घेतली.

महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळातर्फे राबविण्यात आला. भुसावळ तेरापंथ महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण कोटेचा, उपाध्यक्ष पूनम सांखला यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. महिला मंडळातर्फे डॉ.दीपा रत्नानी यांचे आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !