भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या सुजल शुक्लाची आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
Sujal Shukla of D.N. Bhole College in Bhusawal has been selected for the inter-university football tournament भुसावळ (9 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू सुजल महेंद्र शुक्ला (तृतीय वर्ष बी. सी. ए.) ने आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धा एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने तिची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ फुटबॉल संघात निवड झाली. पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा मध्यप्रदेशातील अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ रीवा, येथे 8 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान होत आहे.
सलग तीन वर्ष विद्यापीठ संघात यश
खेळाडूने सलग तीन वर्ष विद्यापीठ संघात यश मिळवल्याने झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार व अभिनंदन केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा.अख्तर खान, प्रा.डॉ.विनय पवार, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.दीपक जैस्वार, प्रकाश सावळे, व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
