भुसावळातील आयुध निर्माणीत कामगारांच्या देशव्यापी आंदोलनाला सुरवात
Nationwide agitation of ordnance factory workers in Bhusawal begins भुसावळ (10 फेब्रुवारी 2026) : शहरातील आयुध निर्माणीत अखिल भारतीय संरक्षण महासंघाच्या आदेशानुसार ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन वतीने मुख्य द्वार येथे राष्ट्रीय आंदोलनास सुरवात झाली.
या मागण्यांसाठी आंदोलन
केंद्रीय कामगार महासंघाच्या वतीने 12 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप सरकारद्वारे कामगार कायद्यात केलेल्या बदलावचे विरोधात करण्यात येणार आहे. त्याच्या समर्थनार्थ व आयुध निर्माणी कामगारांचे महत्त्वपूर्ण मागण्या 41 आयुध निर्माणीचे निगमीकरण रद्द करणे, एनपीएस, युपीएस रद्द करून जुनी पेन्शन लागू करणे, ठेकेदारी प्रथा बंद करून कार्यरत कामगारांना सेवेत समावेश करणे, रिक्त जागा भरण्यासाठी आदेश पारित करणे, मृत कामगारांच्या आश्रितांना अनुकंपा मार्फत सेवेत समावेश करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून झाली.


पहिल्याच दिवशी घोषणाबाजी
पहिल्या दिवशी सर्व कामगार आयुध निर्माणी मेन-गेटवर एकत्र येऊन मागण्यांबाबत माहिती व घोषणाबाजी करण्यात आली. दुसर्या दिवशी सर्व कामगार मागण्यांचे काळे बिल्ले (ब्लॅक बॅजेस) लावून कामावर कार्यरत झाले. 12 रोजी मेन गेटवर धरणा देऊन एक तास काम उशिराने सुरू करणार आहेत.
यशस्वीतेसाठी कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी, सभासद परिश्रम घेत ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे महासचिव दिनेश राजगिरे कळवतात.





