भुसावळात रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकावर लावला डिजिटल फलक
भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : शहरातील रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांना गाड्यांची स्थिती दिसण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून डिजिटल फलक लावण्यात आला आहे. या फलकात कोणती गाडी किती वाजता येणार आहे, स्टेशनवर ती कोणत्या प्लॅटफॉर्मला येईल, याची सविस्तर माहिती प्रवाशांना या फलकाच्या माध्यमातून दिसणार आहे. यामुळे प्रवाशांना स्टेशनवर गेल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचे हे कळणार आहे
एखादी गाडी लेट असेल तर प्रवासी आरामात स्टेशनवर जाऊ शकणार आहे. हा फलक प्रवाशांना फायदेशीर ठरत आहे.







