!-- afp header code starts here -->

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी : रजनी सावकारे


वरणगाव (14 फेब्रुवारी 2026) : नेत्रतज्ञ डॉ.नितु पाटील हे सायन्सचे विद्यार्थी तर आहेच पण कठीण अशी नर्मदा माता परिक्रमा पायी पायी पूर्ण पणे यशस्वी करून ते अध्यात्माचे पण पुरस्कर्ते ठरले आहेत त्यामुळेच वरणगाव येथील रेवा कुटी ही दुहेरी सोनेरी संगम असलेले धार्मिक केंद्र असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले.

सामुहिक हनुमान चालिसा पठण
ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे अध्यामिक केंद्र रेवा कुटी,वरणगाव याठिकाणी संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठणाच्या वार्षिक उपक्रमामध्ये रजनी सावकारे बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, वासुदेव परिवाराने दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबवला आहे. नक्कीच हिंदू जनजागृती उपक्रम उपयुक्त आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान मंदिर आहेत त्याठिकाणी, असे उपक्रम सुरू करणे ही काळाजी गरज आहे. आगामी काळात रेवा कुटी येथील जागा कमी पडेल एवढी हनुमान भक्तांची गर्दी याठिकाणी होईल ,या बाबत मला शंका नाही. यावेळी तपटकाठोरा सरपंच रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, अतुल झांबरे यांची विशेष उपस्थिती होती.


11 वेळा सामूहिक हनुमान चालिसा पठण
वासुदेव परिवाराच्या प्रत्येक सदस्याने 11 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यावर आरती मग प्रसाद आणि अल्पोपहारचा आस्वाद घेतला. या उपर्क्रमासाठी तबला वादक कुणाल शिंदे, दीपक फेगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, उमेश माळी, मनोज गोसावी, लखन शेटे, राम शेटे, राहुल माळी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाळकृष्ण चव्हाण महाराज यांनी तर आभार कमलेश येवले यांनी मानले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !