भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिबिरात ज्येष्ठांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
भुसावळ (14 फेब्रुवारी 2026) : नगरसेविका सीमा प्रशांत नरवाडे यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन केले गेले. प्रसंगी नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजनांची माहिती दिली तसेच उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
यांची होती उपस्थिती
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनीदेखील कार्यक्रम प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला व अपंग महिला यांनादेखील याप्रसंगी सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आले. प्रसंगी भाजपा शहर सचिव वंदना सोनार, भाजपा एससी सेल शहराध्यक्ष रवींद्र दाभाडे, अश्विन नरवाडे, गौतम नगर आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष महेंद्र हिवराळे, पंडित दाभाडे, प्रभागातील शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला. प्रसंगी त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. सूत्रसंचालन विवेक नरवाडे व भाजपा शहर सरचिटणीस जयंत माहुरकर यांनी केले. आभार प्रा.प्रशांत नरवाडे यांनी मानले.







