छत्रपती शिवरायांची तुलना टीपू सुलतानाशी ! मुख्यमंत्री संतापले, हर्षवर्धन सपकाळांची थेट लाजच काढली
Comparing Chhatrapati Shivaji with Tipu Sultan! Chief Minister got angry, Harshvardhan directly shamed Sapkal मुंबई (14 फेब्रुवारी 2026) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे , असे वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
जोडे चाटणे मी या जन्मात पाहिले नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचे काम केले. खर्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारे टिपू सुलतान. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणे मी या जन्मात बघितले नाही.

तत्काळ मागावी माफी
आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केळकी त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि काँग्रेस पक्षाने जरा जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे.






