यावल पालिकेचा ऐतिहासीक निर्णय : मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला देणार दोन हजारांचे अनुदान
लेक लाडकी योजनेला मंजुरी : सर्वसाधारण सभेत एक विषय बहुमताने तर 80 विषय सर्वानुमते मंजूर
Yaval Municipality’s historic decision : A grant of Rs 2,000 will be given to the family after the birth of a girl child यावल (18 फेब्रुवारी 2026) : मुलींचा जन्मदर वाढावा या स्तुत्य संकल्पेतून यावल नगरपालिकेने बुधवारच्या सभेत ऐतिहासीक निर्णय घेत लेक लाडकी योजनेला मंजुरी दिली. या निर्णयानुसार आता मुलीच्या जन्मानंतर संबंधित कुटूंबाला नगरपालिका प्रत्येकी दोन हजारांचे अनुदान देणार आहे. यावेळी 80 विषयांना सर्वानुमते मंजुरी मिळाली.
80 विषयांना मंजुरी
यावल नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली या सभेत तब्बल 81 विषय हे पटलावर होते. यातील लेक लाडकी हा विषय सर्वानुमते हा विषय मंजूर झाला तर नमो गार्डन या विषयाला भाजपने विरोध नोंदवला असला तरी सत्ताधारी गटाने बहुमताने हा विषय मंजूर केला. उर्वरित सर्व 80 विषय हे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यात क्रीडांगण, सीसीटीव्ही कॅमेर्याचा विषय व साने गुरुजी विद्यालयाचे प्रवेशद्वार बदलण्याच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली.

यांची विचार मंचावर उपस्थिती
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे उपस्थित होते.
या विषयांना मंजुरी
शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या क्रीडांगणासाठी आरक्षित जागा विकसीत करणे या विषयाला मंजुरी देण्यात आली. या जागेकरीता 2017 मध्ये नगरपालिकेने एक कोटी 42 लाख रुपये हे या संबंधित मालकाला दिल्याची माहिती नगरसेवक अतुल पाटील यांनी सभागृहाला दिली व सदर क्रीडांगण विकसीत करण्याच्या दृष्टीकोनातून या विषयाला सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात अति महत्त्वाच्या व संवेदनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर ते संपूर्णपणे पोलीस प्रशासनाकडे वर्ग केले जातील व त्याची देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च पोलीस प्रशासनाने करावा, असे सुचित करण्यात आले आहे. व हा विषय देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील विविध महत्त्वकांक्षी विषय हे मंजूर करण्यात आले आहेत.
नमो गार्डनला भाजपचा विरोध
वैशिष्ट्यपूर्णय योजनेत गट क्रमांक 714 व 1038 च्या खुल्या जागेत नमो उद्यान विकसीत करण्याचा विषय पटलावर आला. त्याला भाजपा व महायुतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. सदर गार्डन हे गट क्रमांक 828 किंवा इतर लोकवस्तीतील भुखंडावर व्हावे असा त्यांचा आग्रह होता मात्र पुरेसा निधी याकरिता नसल्याने गट बदलाचा प्रस्ताव नाकारण्यात आला व संबंधित जागेवर नमो गार्डनच्या या विषयाला भाजपच्या व महायुतीच्या सर्व बारा सदस्यांनी विरोध नोंदवला तर सत्ताधारी गटातील 13 सदस्यांच्या मतदानाने बहुमताने हा विषय मंजूर करण्यात आला.







