!-- afp header code starts here -->

शरद पवार दुसर्‍यांदा राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत !


Sharad Pawar is preparing to go to Rajya Sabha for the second time! मुंबई (19 फेब्रुवारी 2026) : 85 वर्षीय शरद पवार दुसर्‍यांदा राज्यसभेवर जाण्याची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांना एकमताने निवडले जावे, अशी मोर्चेबांधणी होत आहे. अर्थात शेवटच्या क्षणी पवार नवा चेहरा निवडू शकतात, अशीही चर्चा आहे. त्याचे चित्र येत्या आठ दिवसांत स्पष्ट होईल.

सात जागांसाठी 16 रोजी मतदान
देशातील 10 राज्यांतील 37 जागांसह महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यात महाविकास आघाडीकडे फक्त 46 मते आहेत. या निवडणुकीतील मतांचा कोटा लक्षात घेता मविआकडून फक्त एकालाच राज्यसभेवर जाता येईल. पवार मैदानात उतरले तर उद्धव सेना, काँग्रेसकडून कुणालाही संधी मिळणार नाही.

2 एप्रिलला महाराष्ट्रातील या सात खासदारांची जागा रिक्त होणार
शरद पवार (राष्ट्रवादी श.प. गट), फौजिया खान (राष्ट्रवादी श.प. गट), रामदास आठवले (रिपाइं आठवले), डॉ.भागवत कराड (भाजप), धैर्यशील पाटील (भाजप), प्रियंका चतुर्वेदी (उद्धव सेना), रजनी पाटील (काँग्रेस) या जागा 2 एप्रिल रोजी रिक्त होत आहेत.

अजित पवार गटावर नैतीक दबावासाठी चाल
राजकीय विश्लेषकांच्या मते पवारांचे राज्यसभा रिंगणात उतरण्याचे संकेत म्हणजे अजित पवार गटावर नैतीक दबावासाठी चाल आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असतानाच, पवारांनी स्वतःचे ‘पॉवर सेंटर’ दिल्लीत सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गट एकत्र आले तर पक्षाची कमान आणि संसदेतील नेतृत्वाची धुरा आपल्याच हाती राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !