पतीच्या मृत्यूची भीती घालत अत्याचार : नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातला अटक
Abuse Under Threat of Husband’s Death: Nashik’s Captain Ashok Kharat Arrested नाशिक (19 मार्च 2026) : अंगात दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून नाशिकच्या ‘कॅप्टन’ अशोक खरातने महिलेवर तब्बल दोन वर्ष अत्याचार केला. या प्रकरणीर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा एकच्या पथकाने मंगळवार, 18 रोजी रात्री 11.30 वाजता कर्मयोगी नगरातील बंगल्यातून त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ब
काय आहे प्रकरण
अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ (तृप्ताबाला बंगला, रा. कर्मयोगीनगर) याने नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओक्स प्रॉपर्टीज्च्या ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला जाळ्यात ओढले. दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. ‘तुझे आयुष्य बरबाद करेन’, ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला.


नेव्ही कॅप्टननंतर खरात थेट ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष
खरातने मर्चंट नेव्हीत 22 वर्षाच्या कारकीर्दीनंतर अंकशास्त्र, ‘कॉस्मॉलॉजी’चा (विश्वशास्त्र) अभ्यास केला. ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत 2010 पासून मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष झाला. 2022 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंदिरात गेले असता खरातने त्यांच्याशीही राजकीय भविष्यावर चर्चा केली. नेव्हीत असताना 154 देशांचे दौरे केले. 13 भाषा शिकल्या.
पेन ड्राईव्ह सापडल्याने खळबळ
बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणार्या कॅप्टनकडील पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. लवकरच या प्रकरणात सत्यदेखील समोर येणार आहे.