तीन लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता नाशिक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक जि.प.मध्ये सापळा यशस्वी ः शाखा अभियंता लाचेची कुणकुण लागताच पसार ः कारवाईने सा.बां.विभागातील लाचखोर हादरले


Construction Department Engineer Caught in Nashik ACB’s Net While Accepting a Bribe of Three Lakhs नाशिक (31 मार्च 2026) : रस्ता कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच घेताना चांदवड जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा अभियंता नाशिक एसीबीच्या जाळ्यात अडकला असून शाखा अभियंता मात्र सापळ्याची कुणकुण लागलाच चर्तुभूज झाल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. विठ्ठल बालाजी पठाडे (46) असे अटकेतील उपविभागीय अभियंत्यांचे नाव आहे तर शाखा अभियंता जिभाऊ कृष्णकांत देवरे (28) असे पसार संशयीताचे नाव आहे. भद्रकाली पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराची फर्म रजिस्टर्ड असून त्यांना ता.हद्द ते बच्छाव वस्ती उसवाड कळमदरे, डोंगरगाव निकमवस्ती ते रामा 24 रस्ता इजिमा 279 मध्ये सुधारणा व डांबरीकरणासाठी 90 लाखांची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर 72 लाख 89 हजार 728 रुपयांचे काम मिळाले व कामानुसार त्यांना 41 लाखांचे बिल आतापर्यंत मिळाले मात्र सद्यस्थितीत कामाच्या टप्प्यानुसार दहा लाखांच्या बिलासाठी पंचायत समितीत मागणी केल्यानंतर आधी काढलेल्या बिलाच्या मोबदल्यात बक्षिसी व आता काढण्यात येत असलेल्या बिलाच्या मोबदल्यात उपविभागीय अभियंता पठाडे याने तीन लाखांची तर शाखा अभियंता देवरे याने दोन लाख 67 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला द्याच द्यायची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली.


जिल्हा परिषदेत लाच घेताना पकडले
उपविभागीय अभियंता विठ्ठल पठाडे याने तीन लाखांची लाच नाशिक जिल्हा परिषदेत स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली मात्र संशयीत शाखा अभियंता कृष्णकांत देवरे यास सापळ्याची कुणकुण लागताच तो पसार झाला. नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !