सोन्याचे मंगळसूत्र केले परत : भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातील कर्मचार्याचा प्रामाणिकपणा
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : शहरातील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी धर्मराज मराठे यांना महाविद्यालय परिसरात सोन्याचे मंगळसूत्र सापडले मात्र त्याचा मोह न बाळगता त्यांनी प्रामाणिकपणा व निस्वार्थ भावनेने हे मंगळसूत्र त्याच्या खर्या मालकाकडे परत केले.
प्रामाणिकपणा अद्यापही शिल्लक
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्ती वाढत असलेल्या काळात धर्मराज मराठे यांनी दाखविलेला हा प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. माणसाची खरी संपत्ती ही पैसा किंवा वस्तू नसून त्याचे प्रामाणिकपण, संस्कार आणि चारित्र्य असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
त्यांच्या या उदात्त, निस्वार्थ व समाजाला दिशा देणार्या कार्याबद्दल श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संस्थाचालक तसेच कोटेचा महिला महाविद्यालय परिवाराच्या वतीने धर्मराज मराठे यांचे कौतुक केले.


