रेल्वेत विनातिकीट वा आरक्षीत डब्यातून प्रवास केल्यास होणार कारवाई


भुसावळ (9 एप्रिल 2026) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विविध भागांतून मुंबईकडे तसेच मुंबईहून परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवासात करतात. भाविकांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले.

विनातिकीट प्रवास केल्यास होणार कारवाई
आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवास करू नये तसेच केवळ वैध आरक्षण तिकिटासहच प्रवास करावा व प्रत्येक प्रवाशाने योग्य व वैध तिकिटासहच प्रवास करावा, विनातिकिट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी अनावश्यक कारणास्तव चेन पुलिंग करू नये, प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी स्थानकांवर रेल्वे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.


रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी सन्मानपूर्वक प्रवासासाठी योग्य व वैध रेल्वे तिकिटासहच प्रवास करावा आणि सुरक्षित, सुसह्य व शिस्तबद्ध प्रवासासाठी सहकार्य करावे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !