पिंपरूड येथे विद्युत वितरणचे काम करणार्या ठेकेदाराचे खांबावरील तार चोरी लांबवले
यावल (शनिवार, 25 जुलै 2026) : यावल तालुक्यातील पिंपरूड गावातील सबस्टेशनपासून ते वढोदा या गावादरम्यान हैदराबाद येथील एनसीसी कंपनीच्या मक्तेदाराने 12 खांब टाकून त्यावर टाकलेले तार चोरी झाले आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचे हे तार असल्याचे सांगण्यात आले. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांनी चिंता
पिंपरुड, ता.यावल येथे सबस्टेशन आहे. वढोदा या गावादरम्यान नितीन राणे यांच्या शेतापासून ते नितीन महाजन यांच्या शेता दरम्यान हैदराबाद येथील नागार्जुन कंट्रक्शन कंपनी यांचे ठेकेदार सागर सपकाळे यांनी बारा खांब टाकून त्यावर अॅल्युमिनियमचे तार टाकले होते. एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे हे तार होते. जे आज्ञात चोरट्यांनी खांबावरून कापून चोरी करून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात सागर सपकाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल मोहे करीत आहे.



