ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरण्याचा वाद : विरवाडेतील तरुणाला बेदम मारहाण
Dispute over Loading Farm Manure into Tractor : Youth from Virwade Brutally Beaten चोपडा (11 एप्रिल 2026) : ट्रॅक्टरमध्ये शेतखत भरण्याच्या वादातून विरवाडेत 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण ?
कल्पेश एकनाथ गिरासे (23, रा.विरवाडे) हे सोमवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्लॉट भागात असताना ट्रॅक्टरमध्ये शेतखत भरण्यावरून आरोपींशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

संशयीत चेतन भोपाल पाटील याने हातातील कड्याने कल्पेश यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी उपस्थित असलेले अन्य संशयित दर्शन दिनेश पाटील, सुमित संजय पाटील आणि पंकज संजय पाटील यांनी कल्पेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कल्पेश यांना ‘जीवे ठार मारण्याची’ धमकीही दिली. याप्रकरणी जखमी कल्पेश गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






