जळगावात महिलेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले


Woman’s Mangalsutra Snatched in ‘Dhoom’ Style in Jalgaon जळगाव (17 एप्रिल 2026) : जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या जिल्हाधिकारी बंगला परिसरातून पायी जाणार्‍या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून नेले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात ?
नीलिमा विश्वासराव पाटील (वय 66, रा. खान्देश मिल कॉलनी, जळगाव) या बुधवार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास भाऊंच्या उद्यानाकडून पायी घरी परतत असताना त्या जिल्हाधिकारी बंगल्याजवळ आल्या असता पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 62 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची मणी-मंगळसूत्र असलेली पोत जोरात हिसकावून नेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील यांनी आरडा-ओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले.


या घटनेनंतर नीलिमा पाटील यांनी तातडीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !