भुसावळात रस्त्यावर उभी असलेली रिक्षा पेटली : सुदैवाने टळली प्राणहानी


Rickshaw Parked on Road in Bhusawal Catches Fire: Fortunately, No Loss of Life भुसावळ (18 एप्रिल 2026) : रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी केल्यानंतर ग्राहक वडा घेण्यासाठी जाताच सुरू असलेल्या रिक्षेने पेट घेतल्याची धक्कादायक घटना शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळ जामनेर रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने या परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीमागील स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसलेतरी तांत्रिक बिघाडानंतर शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे.

काय घडले शहरात ?
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील एका वड्याच्या दुकानासमोर रिक्षा (एम.एच.19 बीडब्ल्यू.1279)ही रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर ग्राहक वडे घेण्यासाठी गेले व चालकाने इकडे रिक्षा सुरूच ठेवली मात्र काही क्षणात रिक्षाने पेट घेताच चालकाने प्रसंगावधान राखले व त्याचवेळी रिक्षाने भीषण पेट घेतला. आग झपाट्याने वाढत गेल्याने काही वेळातच संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली.


आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ही रिक्षा आलम रज्जाक शेख यांच्या मालकिची असल्याची माहिती असून आग लागण्याचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !