भुसावळातील तडीपार पोलिसांच्या रडारवर ! : अचानक होणार तपासणी ; पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले


Externed Individuals in Bhusawal on Police Radar! — Surprise Inspections to be Conducted : Deputy Superintendent of Police Kedar Barbole भुसावळ (18 एप्रिल 2026) : आदेश झुगारून रात्रीच्या वेळी तडीपार शहरात येण्याची शक्यता गृहीत धरून आता तडीपारांची अचानक रात्रीच्या वेळी तपासणी केली जाईल तसेच गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी सर्वोतोपरी पोलीस कायदेशीर कठोर पावले उचलत असल्याचे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.

तर तडीपारांवर होणार कारवाई
शहरातून एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार केलेले अनेक गुन्हेगार नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी घरी मुक्कामाला येत असण्याची शक्यता लक्षात घेता डीवायएसपी बारबोले यांनी भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या. पोलीस कर्मचार्‍यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान तडीपार व्यक्तींच्या घरी जाऊन ते तिथे आहेत का, याची खात्री करावी,असे स्पष्ट करण्यात आले आहे.


गुन्हेगारांची यादी तयार
शहरातून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची अद्ययावत यादी तयार करण्यात आली आहे. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांनी या गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. जे तडीपार नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. जनतेनेही अशा व्यक्तींविषयी माहिती दिल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे डीवायएसपी केदार बारबोले यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !