पारोळा तालुक्यात अल्पवयीनाचा बालविवाह : आई, वडीलांसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा


Child Marriage of a Minor in Parola Taluka : Case Registered Against Parents and Five In-laws पारोळा (18 एप्रिल 2026) : मुलगी अल्पवयीन असतानाच आई-वडीलांनी दिला विवाह लावून दिला व त्यातून पीडीतेने दोन मुलांना जन्म दिला व तिसर्‍या बाळंतपणासाठी पीडीता आल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच आई-वडीलांसह सासरच्या पाच जणांविरोधात पारोळा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीनाचा लावला विवाह
तक्रारदार पीडीता अल्पवयीन असतानाही 2021 किंवा 2022 मध्ये तिचे आई-वडील रा.भडगाव तालुका) यांनी तिचा विवाह तरुणाशी लावून दिला.


विवाहानंतर पीडिता सासरी राहत असताना, ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. यातून पीडितेने यापूर्वी दोन मुलांना जन्म दिला व आता पुन्हा एका मुलाला जन्म दिला. बालविवाह आणि त्यानंतर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे पीडितेचे शारीरिक व मानसिक शोषण झाल्याने व पीडीता अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने पीडीतेचे आई, वडील, पती व सासु सासर्‍यांविरोधात (तीन्ही रा.पारोळा तालुका) पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !