जळगाव जिल्ह्यातील तीन निरीक्षकांच्या बदल्या ; चोपडा शहर निरीक्षकपदी पवन देसले


Transfers of Three Inspectors in Jalgaon District ; Pawan Desle Appointed as Chopda City Inspector जळगाव (18 एप्रिल 2026) : जळगाव जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहत असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तीन निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. चोपडा निरीक्षकांविरोधात नागरिकांनी काढलेल्या मोर्चानंतर त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशा झाल्या बदल्या
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शनिवार, 18 रोजी काढलेल्या आदेशानुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव नियंत्रण कक्षातील संजय पुंजाजी गायकवाड यांची जळगाव शहर वाहतूक शाखेत प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


तत्काळ पदभार घेण्याचे आदेश
बदली झालेल्या संबंधित अधिकार्‍यांनी आपल्याकडील अर्ज, गुन्हे आदी शासकीय दस्तावेज संबंधित पदभार घेणार्‍या अधिकार्‍याकडे सुपूर्द करावेत व अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !