नंदुरबारात छेडखानीच्या वादातून तुफान दगडफेक : 14 जणांना अटक
शहरात खळबळ : पसार आरोपींचा कसून शोध सुरू -जिल्हा पोलिस अधीक्षक
नंदुरबार : रेल्वेत बसलेल्या महिलेची छेडखानी केल्याच्या कारणावरून एका जमावाने रेल्वे स्थानक परीसरात तुफान दगडफेक केली. या घटनेत रेल्वे पोलिस अधिकारीदेखील जखमी झाले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी चार अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली असून अन्य 30 ते 35 संशयीत पसार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना रेल्वेस्थानकावर घडली.
पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://youtu.be/1APbVCBOsZE
आरोपींना ताब्यात देण्याच्या मागणीसाठी दगडफेक
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सुरत येथून नंदुरबारकडे येणार्या एका महिलेची रेल्वेत छेडखानी झाल्यानंतर रेल्वेतील पोलिसांना माहिती देण्यात आल्याने तिघा संशयतांना ताब्यात घेण्यात आले तर पीडीतेने नंदुरबारमधील नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त नातेवाईक रेल्वे स्थानकावर गाडी येण्याच्या प्रतीक्षेत थांबून होते. गाडी आल्यानंतर जमावाने आरोपींना ताब्यात देण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अचानक दगडफेक सुरू झाली तर या घटनेत एक पोलिस अधिकारी जखमी होवून अन्य चार ते पाच कर्मचार्यांनाही किरकोळ ईजा झाली. पोलिसांनी या प्रकरणी 14 संशयीतांना अटक केली असून अन्य संशयीतांचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.