खिर्डीत दुचाकी चोरी प्रकरणी माजी सरपंचाला बेड्या
खिर्डी, ता.रावेर (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : सरपंच पदावरून पायउतार झालेल्या लोकप्रतिनिधीनेच दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यातील खिर्डी बु.॥ गावात घडला आहे. या प्रकरणी संशयीत किरण उर्फ गफूर पितांबर कोळी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी बुद्रुक गावातील हॉटेल व्यावसायिक फिर्यादी प्रवीण रमेश जैस्वाल यांची होंडा युनिकॉर्न (एम.एच.19 ई.एक्स.2679) ही घरासमोरून 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास चोरीला गेली. या प्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर संशयीताला ताब्यात घेताच त्याने दुचाकी चोरी कबुल करीत वाहन काढून दिले. तपास पोलीस हवालदार रिजवान पिंजारी करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर , निींभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रिजवान पिंजारी, हवालदार किरण चाटे, कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, सरफराज तडवी आदींच्या पथकाने केली.

