यावल नगरपरिषदेतर्फे 20 ऑगस्टपासून एकल महिलांचे सर्वेक्षण
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल नगरपरिषद हद्दीतील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी नगरपरिषदेमार्फत विशेष सर्वेक्षण व नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम 20 ऑगस्ट 2026 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येणार आहे.
या सर्वेक्षण मोहिमेंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील खालील प्रवर्गातील महिलांची नोंदणी केली जाणार आहे. यात विधवा महिला, परित्यक्ता महिला, घटस्फोटित महिला, 35 वर्षांवरील अविवाहित महिला अशा महिला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि सामाजिक-आर्थिक स्तर उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेत पात्र महिलांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह यावल नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे जाहीर आवाहन यावल नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


