चिंचोलीत खुल्या क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात


यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील चिंचोली या गावात खुल्या क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत तालुक्यातून तब्बल 16 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये आहे. चिंचोली गावात असलेल्या मैदानावर या स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

खुल्या क्रिकेट स्पर्धा
चिंचोलीत खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा गावालगतच्या मैदानावर सुरू असून उद्घाटन चिंचोलीचे माजी सरपंच अनिल सोळुंके, अनिल साठे, गोपाल चौधरी, प्रभाकर साळुंखे, मुकेश साळुंखे,अजय साळुंके, कमलेश फुगारे,गुलाब साळुंके, दीपक साळुंके, किरण कोळी यांच्या उपस्थितीत पार पडले.

या स्पर्धेत तालुक्यातुन 16 संघ सहभागी झाले असून या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये आहे तर द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता आयोजक अमर साळुंखे, गुड्डू साळुंखे, प्रांत साळुंखे आदी परिश्रम घेत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !