भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ऑन जॉब ट्रेनिंगवर एक दिवसीय कार्यशाळा
भुसावळ (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय व महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑन जॉब ट्रेनिंग/इंटर्नशिप विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, 20 रोजी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
वक्ते म्हणून महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे संचालक मनीष पाटील होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील व महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी उपस्थित होते.
वक्ते मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना ओजेटी युनिर्व्हसिटी या प्लॅटफॉर्ममार्फत इंडस्ट्रियल प्रॉब्लेमवर प्रत्यक्षात कसे काम करता येईल याचे मार्गदर्शन केले. या कामामार्फत विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढून त्यांना नोकरीच्या विविध संधी प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थांने उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रास्ताविक उपप्रचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी करीत आभारही मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षेकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.


