भुसावळ मंडळात हिंदी कार्यशाळा उत्साहात


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे कर्मचार्‍यांमध्ये हिंदी भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच राजभाषा हिंदीच्या प्रभावी वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 19 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान हिंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

20 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यालयाच्या उप महाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ.विभावरी गोरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी कार्यशाळेत उपस्थित कर्मचार्‍यांना राजभाषा नियम, 1976, राजभाषा अधिनियम, 1963 तसेच संविधानातील राजभाषेशी संबंधित तरतुदींविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ.गोरे यांनी राजभाषा हिंदीचा प्रभावी प्रचार-प्रसार तसेच कार्यालयीन कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला. हिंदी भाषेचा कार्यसाधक, सोपा आणि प्रभावी वापर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध तांत्रिक साधनांची व डिजिटल टूल्सची माहिती त्यांनी कर्मचार्‍यांना दिली. या साधनांचा कार्यालयीन कामकाजात वापर करून हिंदीतील कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि प्रभावी कसे करता येईल, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राजभाषा हिंदीशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. कर्मचार्‍यांना राजभाषा धोरण, नियम व हिंदीच्या व्यावहारिक वापराबाबत मार्गदर्शन करून कार्यालयीन कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर वाढविणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !