यावल पंचायत समितीतील अभियंत्याची बदली : कारवाईमुळे उपोषण रद्द


यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : यावल पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता व संगणक चालकाविरूद्ध कोरपावली तालुका यावल या गावाचे माजी सरपंच तथा प्रशासक विलास अडकमोल यांच्या तक्रारीची प्रशासनाने तत्काळ घेत अभियंता चौधरी यांची बदली तर संगणक चालक तडवी यांना नोटीस बजावण्यात आल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?
या संदर्भात कोरपावली, ता.यावल येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी यावल पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी व संगणक ऑपरेटर जावेद तडवी यांच्या कारभारावर आक्षेप घेत या दोन्ही कर्मचार्‍यांवर बदलीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे तक्रार निवेदनाव्दारे केली होती. या दोघा कर्मचार्‍यांची आठ दिवसाच्या आत बदली न झाल्यास आमरण उपोषण करू असे म्हटले होते.

14 ऑगस्ट रोजी तक्रारकर्ते कोरपावली ग्रामपंचायीचे प्रशासकवितास नारायण अडकमोल यांच्या तक्रारीची दखल घेत यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी यांची बदली केली असून घरकुल संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांना आपल्या कामाविषयी तसेच दिरंगाईबाबत वारंवार तालुक्यातून लाभार्थीच्या तक्रारी करण्यात येत असल्याने 15 दिवसांच्या आत सर्व घरकुल लाभार्थींची कामे तत्काळ करावी अन्यथा आपल्या कारभाराची सुधारणा न झाल्यास वरिष्ठ पातळीवर आपल्यावर शक्तीची कार्यवाही बदली संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येइल, अशी नोटीस घरकुल संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांना देण्यात आली.

दरम्यान कोरपावली गावाचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणुन देवेंद्र फेगडे यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेश गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी काढले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !