निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई : शेतकर्‍यांच्या गायी लांबवणार्‍या चौकडीला अटक


निंभोरा, ता.रावेर (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : निंभोरा पोलिसांनी शेतकर्‍यांचे पशूधन लांबवणार्‍या भुसावळसह रावेर तालुक्यातील चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चार गायी ताब्यात घेण्यात आल्या असून आरोपींच्या अटकेने पशूधन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पशूधन चोरी प्रकरणी गुन्हा
निंभोरा बुद्रुक (ता.रावेर) येथील सबस्टेशनजवळील वाड्यावरून दोन शेतकर्‍यांच्या एकूण 66 हजार रुपये किंमतीच्या चार गायी चोरीला गेल्यानंतर शेतकरी लक्ष्मण गोविंदा बोढे (65, रा.निंभोरा बु., ता.रावेर) व शेजारील वाडा असलेले सुपडू विश्वनाथ नेमाडे यांनी निंभोरा पोलिसात तक्रार दिली होती. 29 जुलेच्या रात्री प्रत्येकी 22 हजार रुपये किंमतीच्या एकूण चार गायी चोरट्यांनी लांबवल्या होत्या.

आरोपींच्या चौकडीला बेड्या
निंभोरा पोलिसांनी गोपनीय माहिती व फुटेजच्या आधारे हयात शेख मासून मन्यार (25, रा.मन्यारवाडा, चिनावल, ता.रावेर), शेख आवेश शेख एजाज खान (20, रा.ख्वाजानगर, सावदा, ता.रावेर), शेख राजीद शेख शरीफ (23, रा.ईदगाहजवळ, रसलपूर, ता.रावेर) व शेख नासीर शेख चांद (45, रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, हवालदार अविनाश पाटील, किरण कोळी आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !