प्रयागराज/सूबेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या आता नियमित अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार
भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : प्रवाशांची सुविधा तसेच रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करून त्यांचे संचालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रयागराज/सूबेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या आता नियमित अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार आहेत.
प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक 04151/04152 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष नियमित गाडी क्रमांक 20436/20435 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून संचालन करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 20436 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 21 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक शुक्रवारी प्रयागराज येथून 6.10 वाजता सुटेल आणि शनिवारी 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 20435 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 22 ऑगस्ट 2026 पासून प्रत्येक शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 5.20 वाजता सुटेल आणि रविवारी 12.40 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीला सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण.
सुबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक 04115/04116 विशेषचे नियमित गाडी क्रमांक 14121/14122 सूबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून संचालन करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 14121 सूबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 27.08.2026 पासून प्रत्येक गुरुवारी सूबेदारगंज येथून 12.10 वाजता सुटेल आणि शुक्रवारी 20.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 14122 लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 28.08.2026 पासून प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10.55 वाजता सुटेल आणि रविवारी 7.30 वाजता सूबेदारगंज येथे पोहोचेल. या गाडीला फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम कर्वी, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.
दोन्ही अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची कोच संरचना – 11 सामान्य श्रेणीचे कोच, 8 स्लीपर श्रेणीचे कोच, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच असतील.
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच, आरामदायी आसनव्यवस्था तसेच विविध आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.


