यावलमध्ये कानबाई मातेचे वाजत-गाजत आगमन
यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : खान्देशचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचे शुक्रवारी यावल शहरातील नगरसेविका वैशाली निलेश बारी यांच्या निवासस्थानी वाजतगाजत आगमन झाले. मातेच्या आगमनप्रसंगी परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी उत्साहात सहभागी होत भक्तिमय वातावरणात कानबाई मातेचे जल्लोषात स्वागत केले.
उत्साहाचे वातावरण
कानबाई मातेच्या आगमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वाजतगाजत मातेचे आगमन होत असताना भाविकांनी दर्शन घेतले. महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने मातेचे स्वागत केले. यावेळी परिसरात कानबाई मातेच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कानबाई मातेची विधिवत स्थापना रविवारी करण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या धार्मिक उत्सवानंतर सोमवारी वाजतगाजत मिरवणूक काढून कानबाई मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे. या निमित्ताने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, धार्मिक परंपरेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


