भुसावळात रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : मलकापूरच्या मोबाईल चोरट्याला बेड्या


भुसावळ (रविवार, 23 ऑगस्ट 2026)  : भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत मलकापूरच्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. संशयीताकडून 23 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. सादीक शाह मोहम्मद शाह (27, मलकापूर) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गस्तीदरम्यान संशय आल्याने कारवाई
शनिवार, 22 रोजी भुसावळ स्थानकावर आरक्षक देवेंद्र दीक्षित, सिडीपीएस ड्युटीवरील प्र.आ. इमरान खान आणि प्र.आ. महेंद्र कुशवाहा यांना स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 08 वरील कचराकुंडीच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आली. त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास आरपीएफ पोस्ट, भुसावळ स्थानकात आणण्यात आले. यावेळी त्याने आपले नाव सादीक शाह मोहम्मद शाह (27, मलकापूर) सांगितले व झडतीत त्याच्याकडे दोन मोबाईल आढळले. आरोपीने दोन्ही मोबाईल स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीतील प्रवाशांकडून चोरल्याची कबुली दिली. आरोपीलाभुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !