ईद मिलादुन्नबी निमित्त दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग जीएनआरएफतर्फे देशभरात सामाजिक सेवा
भुसावळ (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग जीनआरएफ (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे देशभर विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गोदावरी रुग्णालयात फळ वाटप
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भुसावळातील टीमच्या वतीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व खाद्यपदार्थांचे पॅकेट वितरित करण्यात आले. या उपक्रमातून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मानवता, सहानुभूती आणि सेवाभावाचा संदेश पोहोचविण्यात आला.



यावेळी दावते इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांनी सांगितले की, संस्थेच्या वतीने देशातील विविध भागांमध्ये रुग्णालये, अनाथालये आणि कारागृहांमध्ये रुग्ण, मुले तसेच कैद्यांना फळे व खाद्यपदार्थांचे पॅकेट वितरित केले जात आहेत. तसेच नागरिकांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे आणि रक्तदान शिबिरे यांसारखे सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
याशिवाय पैगंबर-ए-इस्लाम क्ष् यांच्या न्याय, प्रेम, दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये मोठे होर्डिंग्ज व बॅनर्स लावण्यात येत आहेत.
सेवाभाव वाढवणे हाच उद्देश
जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी सांगितले की, या सामाजिक सेवांचा उद्देश समाजामध्ये बंधुभाव, सहानुभूती, मानवता आणि सेवाभाव वाढविणे हा आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत व मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यांनी घेतले विशेष परिश्रम
हा सामाजिक उपक्रम यशस्वीतेसाठी शोएब अत्तारी, अब्दुल सईद, सय्यद साबीर, युसूफ खान, हाजी तनवीर, फरीद शेख, आबीद शेख, अली शेख, अहमद रजा, शेख कारी इद्रीस, अबू सलीम, मौलाना झुल्फिकार, दानिश कुरेशी आणि हाफिज कासिम यांच्यासह जीएनआरएफ स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.

