भुसावळात उसनवारीच्या पैशातून पिता-पूत्रास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


भुसावळ (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : हात-उसनवार घेतलेल्या पैशांच्या वादातून पिता-पूत्रांसह दोघांनी मारहाण करीत लोखंडी आसारीने हल्ला केला. ही धक्कादायक घटना शहरातील भोई नगरात 25 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
शहर पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पप्पू उर्फ उमेश रमेश भोई (32, मथुरा अपार्टमेंट, भोईनगर, भुसावळ) यांनी संशयीतांकडून हातउसनवार पैसे घेतले होते व त्या वादातून 25 रोजी सायंकाळी संशयीत नितीन भोई व पवन भोई यांनी त्यांच्यासह वडील रमेश भोई यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली तसेच तक्रारदाराच्या डाव्या हातावर लोखंडी आसारी मारली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय युनूस शेख करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !