भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात


भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : शहरातील द वर्ल्ड स्कूलमध्ये ‘एक राखी अनंत रिश्ते’ संकल्पनेवर रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका रचना रोहित कोलते व शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी.हैसेट यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमात पोलीस, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक व इतर सामाजिक सहाय्यकांना निमंत्रित करण्यात आले. रक्षाबंधनाचा संदेश केवळ भाऊ-बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून समाजातील निःस्वार्थ सेवकांशी जोडलेल्या प्रेम, विश्वास व सन्मानाच्या नात्याचे प्रतीक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

रचना कोलते यांनी सामाजिक बांधिलकी व मानवतेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शिक्षक, समन्वयक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !