भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शनिवार, 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ निमित्त उत्साह पूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे युथ व एज फ्रॉड कमिशनचे चेअरमन निलेश बाविस्कर, जळगाव जिल्हा पोलीस बलाचे प्रमुख संतोष सुरवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन
याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थी खेळाडूद्वारा विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. विविध क्रीडा प्रकारांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा नैपुण्य, शिस्त, आत्मविश्वास व संघ भावना यांचे उत्कृष्ट सादरीकरण करीत सर्व मान्यवर व उपस्थितांची मने जिंकली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, राजीव पारीख, प्रवीण भराडिया, प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख हिंमत पाटील, प्रशिक्षक चंद्रशेखर बरगले व सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक आर.के.तायडे व शिक्षिका हिना पटेल यांनी मानले. आभार प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मानले.
