भुसावळात उद्या 34 वी ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा


भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र राज्य तलवारबाजीची संघटनेच्या वतीने आयोजित 34वी ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धा अमरावती येथे 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी निवड चाचणी सोमवार, 31 ऑगस्ट 2026 दुपारी चार वाजता शहरातील सेंट अलॉयसीस हायस्कूल येथे होत आहे.

1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेसाठी येताना वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स आणि रुपये 50 प्रवेश शुल्क सोबत आणावे, असे आवाहन जळगाव जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे तसेच जळगाव जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव प्रशांत जगताप, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.प्रदीप तळवलकर, गोरख सूर्यवंशी (चाळीसगाव), राजीव कुलकर्णी (भुसावळ), प्रा.डॉ.संजय चौधरी (भुसावळ), मेघश्याम शिंदे (भुसावळ), किशोर चौधरी (जळगाव) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत जगताप (9423493419) व मेघश्याम शिंदे (9823298216) यांच्याशी संपर्क साधावा.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !