‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर : प्रदेशाध्यक्षपदी वैशाली पाटील
रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांच्याकडे विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
भुसावळ (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : व्हॉईस ऑफ मीडिया, महिला विंग महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नारीशक्तीला संघटित करून पत्रकारितेतील महिलांच्या प्रश्नांना बुलंद आवाज देण्याचा निर्धार या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून वैशाली पाटील तर रोशनी बैस व सारीका शिंदे यांच्यावर विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
पदाधिकारी राबवणार विविध उपक्रम
राज्याच्या सर्व विंगच्या प्रमुख असणार्या रश्मी मारवाडी यांनी ही निवड केली. सविता चंद्रे यांनी या निवडीला अनुमोदन दिले आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, भारत देशाचे अध्यक्ष अनिल म्हस्के, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध विभागांत कार्यरत महिला पत्रकारांना एका सक्षम संघटनात्मक छत्राखाली आणून त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी प्रभावीपणे काम करण्याचे धोरण महिला विंगने निश्चित केले आहे.

अन्य पदाधिकारी असे
राज्य महिला विंगच्या नव्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष (सुप्रीम) म्हणून वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून लक्ष्मी वाढेकर, उपाध्यक्ष म्हणून शुभांगी करने तर महासचिव म्हणून रेणुका कोटम्बकर, सहसचिव म्हणून ज्योती सरपाते तर खजिनदार म्हणून पल्लवी शेटे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अन्य पदाधिकारी असे
कार्यवाह म्हणून वैशाली चवरे, उषा नाईक, मुक्ता आरडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवक्तेपदाची जबाबदारी रंजना जळगावकर यांच्याकडे देण्यात आली. जनसंपर्क प्रमुख म्हणून अहिल्या कसपटे यांची निवड करण्यात आली. राज्य संघटक म्हणून सोनाली सगर, विजया बारसे आणि धनश्री खडके यांची नियुक्ती करण्यात आली. संघटक म्हणून स्वाती खुणे आणि सुनीता सकाळीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. सदस्य म्हणून दिशा पाटील, अनुराधा आहेर आणि सोनिया साठे, रुकसार शेख यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील विभागनिहाय संघटनात्मक विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी पाचही विभागांमध्ये महिला नेतृत्वाची मजबूत फळी उभारण्यात आली आहे. विदर्भ विभागासाठी कविता नागापुरे, कोकण विभागासाठी समिधा खपाळे, मराठवाडा विभागासाठी दर्शना बोर्हाडे पाटील, उत्तर महाराष्ट्रासाठी उज्वला बागुल आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ऋतुजा कदम यांची महिला प्रदेश विभागीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
