कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्धेची पोत तर वयोवृद्धाकडील रोकड लांबवली
मुक्ताईनगर (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे सुरू असलेल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने वृद्ध महिलेच्या जवळील सोन्याचे दागिने लांबवले तसेच अन्य एका वृद्धाकडील पाच हजार सहाशे रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले कोथळीत ?
कमलबाई उमरावसिंग पाटील (70, जुनोने दिगर, ता.बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 30 त्या कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या मात्र गर्दीचा फायदा घेत सकाळी 11.30 वाजेचदरम्यान त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची व 45 हजार रुपये किंमतीची पोत चोरट्यांनी लांबवली तसेच साक्षीदार आनंदा तुकाराम पाटील यांच्या खिशातील पाच हजार 600 रुपयांची रोकड व आधारकार्ड लांबवण्यात आले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप वानखेडे करीत आहेत.

