डांभूर्णीतील तरुणाला चौघांची मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा


यावल (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे वाहन कोणीतरी पंक्चर करत असल्याने 30 वर्षीय तरुणाने शिविगाळ केली. याचा राग येऊन चौघांनी त्याला लोखंडी रॉडने मारून दुखापत करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
डांभूर्णी, ता.यावल येथील शरद नामदेव कोळी यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चारचाकी वाहन कोणीतरी पंक्चर करीत असल्याने हे वाहन कोणीतरी मुद्दाम पंक्चर करीत असल्याच्या संशयातून त्यांनी शिविगाळ केली व याचा राग येऊन विनोद प्रकाश सपकाळे, अनिल प्रकाश सपकाळे, रामचंद्र प्रकाश सपकाळे व रोहन अनिल सपकाळे या चार जणांनी त्याला शिविगाळ केली व लोखंडी रॉडने मारून दुखापत केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली.


याप्रकरणी यावल पोलिसात शरद कोळी यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस शिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !