ग्रामपंचायत आरक्षण : रावेर तालुक्यात पाच ओबीसी जागा घटल्या
नऊ जागांवर ओबीसी महिलांना मिळणार संधी
रावेर (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : रावेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षणासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. पूर्वीच्या तुलनेत पाच ओबीसींच्या जागा घडल्या असून सरपंचपद नामाप्र महिला राखीव नऊ जागांसाठी तसेच 21 जागांवर सर्वसाधारण महिला आरक्षण काढण्यात आले.
यांची होती उपस्थिती
रावेर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे, नायब तहसीलदार संजय तायडे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार किशोरपवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, महसूल सहाय्यक भूष कांबळे यांची उपस्थिती होती. प्रसंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असे- सुनोदा, अजंदे, धुरखेडा, वाघाडी, रमजीपूर, विवरे बु.॥, उटखेडा, अहिरवाडी, अजनाड, चोरवड ग्रुप ग्रामपंचायत
नागरिकांचा प्रवर्ग राखीव आरक्षण असे- वाघोदे बुद्रुक, कर्जोद, थोरगव्हाण, सिंगत, रणगाव, खिर्डी खुर्द, खिर्डी बुद्रुक, दसनूर
41 सर्वसाधारण पैकी 21 ग्रामपंचायतीत महिलांना संधी- बक्षीपूर, उदळी खुर्द, कोचूर खुर्द, मस्कावद खुर्द, आंदलवाडी, सावखेडा खुर्द, पुरी/गोलवाडे ग्रुप, रायपूर, गाते, शिंगाडी, विटवे, भोकरी, मोरगाव बु.॥, निंबोल, मोरगाव खुर्द, वडगाव, बलवाडी, तासखेडा, ऐनपूर, रेंभोटा व निंभोरा बु.॥
सर्वसाधारण सरपंच पद : कोळोदे, केर्हाळे खुर्द, नांदूरखेडा, भाटखेडा, केर्हाळे बुद्रुक, खिरोदा प्रगणे यावल, रसलपूर, उदळी बुद्रुक, रोझोदे, तांदलवाडी, तामसवाडी, खिरवड, आठवडे, पातोंडी, मंगलवाडी, सुलवाडी, निंभोरासीम, कांडवेल, शिंदखेडा, गौरखेडा आदी

