कुर्‍हेपानाचेतील स्व.स्वप्नील स्मृती गोकुल ग्राममध्ये पोळा उत्साहात


भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावाजवळील स्व.स्वप्निल स्मृती गोकुल ग्राम येथे पहिलाच पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी सर्व सर्जा-राजांची पूजा करून त्यांना नमन केले.

यांची होती उपस्थिती
सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.मोहन देशपांडे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजीव एम तडवी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता रवींद्र रोकडे व भूषण भामरे उपस्थित होते. सर्व नंदीची यथायोग्य पूजा करून आरती करून सर्व कर्मचार्‍यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

बळीराजाचे औक्षण गायत्री जगताप व मंदा तोरे यांनी केले. सखाराम बारेला, गोलु राऊत, अप्पा जगताप, मनोज राठोड, रोशन बारेला, महेश जगताप, ईश्वर तोरे यांचा या प्रसंगी ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डी.एम.ललवाणी यांनी सत्कार केला.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !