बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या


मुंबई : बॉलिवूड स्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरातील नोकराने पोलिसांना याबाबतची माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर हॉस्पिटलला पाठवला आहे. सुशांतने नेमकी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप कळू शकलेले नाही मात्र आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.

टीव्ही ते बालिवूड स्टार
‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका तर एकता कपूरच्या ‘पवित्र रीश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली तर ‘काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने सुशांतला स्टार बनवले. काही महिन्यांपूर्वी सुशांतचा ‘छिछोरे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आत्महत्या करणे आयुष्यावरचा तोडगा नाही, असा संदेश सुशांतने दिला होता. आत्महत्या न करण्याचा संदेश देणा-या याच सुशांतने आज आत्महत्या करत जीवन संपवले, हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !