भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेत सुनसगाव विद्यालयाचे वर्चस्व
भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : सेवा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय शालेय मुलींच्या खो-खो व मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये झाल्या. त्यात विविध शाळांमधील तब्बल 44 संघांनी सहभाग घेतला.
यांची होती उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी शेख परवेज यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन क रण्यात आले. यावेळी संगीता बियाणी, वैभव पवार, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.पी. सुलताने, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, विलास पाटील, हिंमत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
खो-खो स्पर्धेतील विजेते
मुलींच्या 14 वर्षे वयोगटात दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय, सुनसगावचा संघ विजेता तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
17 वर्षे वयोगटात दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालयाचा संघ विजेता तर माध्यमिक विद्यालय, ओझरखेडा संघाने उपविजेतेपद मिळविले.
19 वर्षे वयोगटात गंगाधर सांडू चौधरी विद्यालयाचा संघ विजेता तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
19 वर्षे वयोगटातील अन्य सामन्यात महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव संघाने प्रथम तर अलहिरा उर्दू स्कूल, भुसावळ संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
हॉलीबॉलमध्ये महात्मा गांधी विद्यालयाची बाजी
मुलांच्या 14 वर्षे वयोगटात ताप्ती पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला तर बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ संघ द्वितीय ठरला.
17 वर्षे वयोगटात के.नारखेडे विद्यालयाने प्रथम तर पंडित नेहरू विद्यालय, वराडसीम संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
19 वर्षे वयोगटात महात्मा गांधी विद्यालयाचा संघ प्रथम, तर बियाणी पब्लिक स्कूलचा संघ द्वितीय ठरला.
क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून बजावली जबाबदारी
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ.प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, हिंमत पाटील, विजय संकट, मुकेश मोरे, उमेश राठोड, नामदेव चव्हाण, निलेश राजपूत, दत्तू अहिरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, योगेश खिर्डीकर, गणेश बोदडे, वंदना ठोके, अर्चना राजपूत आदी क्रीडा शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली. तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




